नागरीक मरनयातना भोगत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष… खा संजय दिना पाटील
नागरीक मरनयातना भोगत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष… खा संजय दिना पाटील
मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असून ईशान्य मुंबई परिसर डंम्पिग ग्राऊंड झाला आहे. प्रदुषणाच्या विळख्यामुळे हे शहर आता राहणे योग्य राहिले नाही. शहरातील डम्पिंग ग्राऊंड मधील वैद्यकीय कच-यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने स्थानिक नागरीकांचे आयुमान कमी झाली आहे. स्थानिकांना विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांनी ग्रासले असून त्यावर उपचार करण्यासाठी पुर्व उपनगरात एकही सुसज्ज असे रुग्णालय नाही. जे रुग्णालय आहे तेथे डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरीक मरत यातना भोगत आहेत. मात्र सत्ताधा-यांना त्याचे काहीच सोयरसुतक राहिले नसून अधिकारी कोणाचे ऐकेनासे झाले आहे. प्रशासकीय अधिका-यांचा मुजोरपणा वाढत चालला असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले. वांद्रे येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा.संजय दिना पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरीत नागरीकांच्या मुलभुत प्रश्नांवर प्रशासनाला कोंडीत पकडले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade