काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ
काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ
मुंबई - काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी दुकानदार आणि पादचारी करत आहेत. काळ चौकी येथील हा रस्ता अतिशय अरुंद असून या ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ता वर खाली असल्याने अनेक गटारे देखील बाहेर आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन लोक गंभीर जखमी होत आहेत. काळाचौकी परिसरामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
तसेच अनेक शाळा याच मार्गावर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची गर्दी असते त्यांना देखील या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या खोदकामामुळे अनेक अपघात होत आहेत याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आले आहेत याबाबत मी त्वरित महापालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांशी यासंबंधी पत्र व्यवहार केला असून हा रस्ता त्वरित दुरुस्त होईल अशी माहिती स्थानिक नगरसेविका सुप्रिया दळवी यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant