मुंबई विद्यापीठाने बंद केल्या 304 परीक्षा
मुंबई विद्यापीठाने बंद केल्या 304 परीक्षा
मुंबई - मुंबई विद्यापीठ आता नव्या काळानुरुप अभ्यासक्रमात आवश्यक बदल स्वीकारून जुने कालबाह्य अभ्यासक्रम बंद करत आहे. विद्यापीठाकडून जुन्या अभ्यासक्रमांच्या 304 परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शून्य नोंदणी असलेल्या 125 परीक्षा आणि अभ्यासक्रम बंद होऊन 10 वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या 179 परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत.
शून्य नावनोंदणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये विविध शाखांचा समावेश आहे. यात वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील 23 परीक्षा, मानवशास्त्र विभागातील 15 परीक्षा, बहुशाखीय 42 परीक्षा आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील 45 परीक्षा आहेत. या परीक्षांना काही वर्षांत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून विद्यापीठाने त्यांना बंद करण्याचे ठरवले.
मुंबई विद्यापीठाने जुन्या आणि अनावश्यक अभ्यासक्रमांच्या परीक्षा थांबवण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत ज्या पाठ्यक्रमांना एकाही विद्यार्थ्याने नाव नोंदवले नाही, अशा 125 परीक्षा आणि ज्या अभ्यासक्रमांना दहा वर्षांहून अधिक वेळ झाला आहे, अशा 179 परीक्षा अशा एकूण 304 परीक्षा निष्क्रिय करण्यात आल्या आहेत. यामुळे या परीक्षा आता नियमित घेतल्या जाणार नाहीत. हे बदल परीक्षा विभागाने लागू केले असून, विद्यार्थ्यांच्या कमी स्वारस्यामुळे आणि काळानुसार हे अभ्यासक्रम जुने झाल्याने हे पाऊल उचलले गेले आहे. विद्यार्थ्यांना नवीन आणि व्यावहारिक अभ्यासक्रमांकडे वळवण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade