शिवडी येथील टी जे रोडवरील विविध समस्यांबाबत उच्चभ्रू सोसायटीतील रहिवासी रस्त्यावर उतरणार.
शिवडी येथील टी जे रोडवरील विविध समस्यांबाबत उच्चभ्रू सोसायटीतील रहिवासी रस्त्यावर उतरणार.
मुंबई - शिवडी येथील टी जे रोड वरील अनधिकृत फेरीवाले अनधिकृत पार्किंग यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिक स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. वारंवार स्थानिक पोलीस प्रशासन वॉर्ड ऑफिस स्थानिक आरटीओ प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विनंती करून बैठका घेऊन अर्ज देऊनही यावर कार्यवाही होत नाही आहे. दिवसेंदिवस नवीन बांधकामे कन्स्ट्रक्शन रहिवासी संकुले यांचे नवीन प्रोजेक्ट उभे राहत आहेत पण रस्ता रुंदीचा कुठलाही प्रयत्न होत नाही. यामुळे रस्त्यावर नियमित अपघात होणे गाडी चालक व फेरीवाले यांच्यात बाचाबाची होणे प्रकरण मारामारी पर्यंत जाणे असे प्रकार नियमित होत आहेत. याला कंटाळून टी जे रोडवरील सर्व हाइराइज सोसायटी एकत्र होऊन याविरुद्ध 14 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक प्रशासनाविरुद्ध निदर्शन आंदोलन करणार आहेत.
या सर्वांचा जास्त त्रास दोस्ती फ्लेमिंगो कॉम्प्लेक्सला होत आहे.
याविषयी रीतसर तक्रार असिस्टंट कमिशनर बीएमसी एफ साउथ वॉर्ड , आरे के मार्ग पोलीस स्टेशन, स्थानिक आरटीओ पोलीस अधिकारी यांना दिली आहे अशी माहिती समाजसेवक राजन घाग यांनी दिली.
याबाबत नुकतीच दोस्ती फ्लेमिंगो रहिवाशांची सीनियर पोलीस इन्स्पेक्टर तावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट घेऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले. पण अशा कारवाया फक्त एक दोन दिवसासाठी असतात तिसऱ्या चौथ्या दिवसापासून अनधिकृत फेरीवाले पुन्हा आपापल्या जागा व्यापतात.
यासाठी दोस्ती फ्लेमिंगो व इतर सर्व सोसायटीतील एकत्र येऊन सदर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade