महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टमध्ये भव्य व रंगारंग वार्षिकोत्सव ‘उड्डाण-२०२६ चे शानदार आयोजन.
महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टमध्ये भव्य व रंगारंग वार्षिकोत्सव ‘उड्डाण-२०२६ चे शानदार आयोजन.
मुंबई - महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित राजे शिवाजी विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय सिराठी, हिंदी, उर्दू माध्यम) तसेच मनोहर जोशी महाविद्यालय येथे विद्याध्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या अंगभूत का गुणांना निखारण्यासाठी ट्रस्टच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उड्डाण-२०२८ अव्य आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, दि. ३१ जानेवारी, २०२८ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ मा वेजेल ट्रस्टच्या पी.एम.जी.पी कॉलनी, धारावी, मुंबई वैधील भव्य प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित कव्वाली तसेच सावित्रीबाई फुले यांचे कन्या शिक्षणातील योगदान, नारीशक्ती, वृद्धाश्रमांचा वाढता कल व मोबाईलचे वाढते व्यसन अशा विविध सामाजिक तसेच ज्वलंत विषयांवर आधारित विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाला आयकर अधिकारी रामकृष्ण झा, दोपहर का सामना’चे उपसंपादक संदीप पांडे, स्थानिक नगरसेविका आशा काळे, धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर, डब्ल्यूपीपी स्वयंसेवी संस्थेच्या रमा मॅडम तसेच ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार बाबूराव माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वीणा राजेंद्र दोनवलकर यांना अनुनयनांनी निरोप देण्यात आला व त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सर्वांनी गौरव केला व कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वासोबतच संस्थेचे सचिव दिलीप शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री. प्रमोद माने, मुख्याध्यापिका वीणा दोनवलकर मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या प्रिन्सिपल व ट्रस्टी मैबर स्वाती होलमुखे मॅडम, प्राथमिक विभागाच्या प्रिन्सिपल सौ. श्रद्धा माने मॅडम, मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्राचार्या मृणाल रसाळ मॅडम, माजी मुख्याध्यापक पोटे सर, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ वाघमारे, विलास गोरेगावकर, परशुराम इंगोले, सुरेश सावंत अंकुश कारंडे व पत्रकार भीमराव धुळप, अधिक्षक चंद्रकांत म्हात्रे सर व रिझवान सर तसेच सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. बाबूराव माने सर यांनी विद्याथ्यांचे मनोबल वाढवत वर्षभरात कला, शिक्षण व क्रीडा आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केले. उपस्थित कला-प्रेमीनी या शानदार व जोशपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक व उत्साहवर्धन केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade