ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायर्नमेंट) या संस्थेच्या उपक्रमांतर्गत स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र, परळ यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा परळ येथील भावसार हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मुंबई व परिसरातील ७५ ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या सांगता समारंभात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्व. मधुकर शंकर लाड स्मृती चषकाचे प्रथम पारितोषिक श्री. अशोक अंबुर्ले यांनी पटकावले. स्व. शा. कांतिलालजी मानमलजी साकरिया स्मृती चषकाचे द्वितीय पारितोषिक श्री. आनंद गोविंद कदम यांना मिळाले. स्व. रमेश रामचंद्र खुळे स्मृती चषकाचे तृतीय पारितोषिक श्रीमती लीला देविदास डांगी (वय ८६ वर्षे) यांनी जिंकून उपस्थितांची विशेष दाद मिळवली. स्व. प्रतिभा प्रभाकर कोलगे स्मृती चषकाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रिया बेर्डे, तर स्व. विष्णू धोंडू शिंदे स्मृती चषकाचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक दास यांना प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ व नामवंत कलाकारांनी केले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ गायिका पुष्पाताई पागधरे यांनी भावगीत व चित्रपट संगीताच्या दृष्टीने रसिक आणि स्पर्धकांना प्रेरणादायी निकष दिले. संगीत विशारद, संवादिनी वादक आणि अनुभवी शिक्षक प्रविण देशपांडे यांनी तांत्रिक अचूकता व लयबद्धतेवर भर दिला. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सिद्धहस्त गायिका व संगीत शिक्षिका कल्पनाताई कोठारे यांनी गायनातील भाव, सूर आणि सादरीकरणाच्या सूक्ष्म बाबी अधोरेखित केल्या.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती दिलीपभाई जैन उपस्थित होते. फेस्कॉम मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोटे व सल्लागार शरद डिचोलकर यांनी मार्गदर्शन केले. CSSC, RRTC मुंबईच्या प्रकल्प समन्वयक निलिमा येतकर, लेखापरिक्षक श्रीकांत कुलकर्णी, अॅड. अशोक सुत्रावे, किशोर आंबेकर, राजेंद्र फुटाणकर, राजू ढवळे आणि विजय औंधे यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी संयत आणि प्रभावी शैलीत केले. तर आभारप्रदर्शन स्वामी संस्थेचे अध्यक्ष सुरेश लाड यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुरेश लाड, कार्याध्यक्ष मोहन कटारे, रचना खुळे, रश्मी नाईक, ममता खेडेकर, विमल माळोदे, प्रतिभा सावंत, गीता नाडकर्णी, सुमंगल गुरव, कांतिलाल परमार, शैलेश तुम्मा, राजाभाऊ कदम, उल्हास हरमळकर, गोविंद राणे, अनिल तावडे, वैशाली शिंदे, प्रतिभा सपकाळे, नम्रता पडवळ कार्तिक बैकर, शिवाजी गावकर आणि संतोष गोलपकर यांनी विशेष सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि सामाजिक सहभाग वाढावा, या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा उपस्थितांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade