चेहेरा
- by
- Jan 30, 2021
- 1422 views
मीरा के बोल
चेहर्यावरती अनेक चेहेरे,सुंदर कुरुप बरेच चेहेरे
या खोटया चेहर्याने पलीकडे, दिसले कधी खरे चेहेरे?
एक चेहेरा ओळखीचा, वाटुलागे सोबतीचा
तोच चेहेरा का मग, वर्षांनी भासे परक्याचा...
आयुष्य जसे सरत जाती,चेहेर्यांवर चेहेरे चढत जाती
ह्या असंख्य चेहेर्यामधला, खरा चेहेरा अलगद सारे विसरून जाती...
आकाशातल्या चेहर्यानेे दिला असता एक चेहरा
का मोह व्हावा लावण्यास त्यावर दूसरा खोटा चेहरा....
खर्या चेहर्याला का भासे गरज खोटया चेहर्याची
गरज एका वर भागत नसून होऊन बसते अनेक चेहर्यांची..
जीवनाच्या सांजेला मग ओझे वाटती ह्या चेहेर्यांचे
केविलवाणे होई मन, सोडताना गाठी ह्या चेहर्यांचे..
वैकुंठास जाताना मग इथले चेहेरे इथेच काढावे लागती
आकाशातल्या चेहर्याने दिलेल्या चेहर्यावर मग अंत्यसंस्कार घडती!!
मीरा पितळे
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya