आखाती युद्धाचा गणेश मूर्तींना फटका, गणेश मूर्तिकार चिंतेत.
आखाती युद्धाचा गणेश मूर्तींना फटका, गणेश मूर्तिकार चिंतेत.
पनवेल – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गणेश मूर्तींचे माहेरघर असणाऱ्या पेण, हमरापूर मधील गणेशमूर्ती यंदा परदेशात उशिरा पोहचत असल्याने मूर्तिकारांना याचा मोठा फटका बसत आहे. आखाती देशातील युद्धाचा फटका मूर्ती व्यावसायिकांना देखील बसल्याने जे एन पी ए बंदरात इतर शेतमालाचे कंटेनर बंदरात अडकून पडल्याने गणेशमूर्ती घेऊन जाणारे कंटेनर ठेवण्यास जागा नसल्याने याचा परिमाण मूर्तिकारांना सहन करावा लागत आहे.
दुबई, लंडन, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, थायलंड, मॉरिशस, साउथ आफ्रीका सारख्या देशात समुद्रमार्गे घेऊन जाण्यासाठी हा कालावधी योग्य असतो. मात्र आता युद्धाचा भडका असल्याने मूर्तींची परदेशवारी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी जानेवरी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात हजारो गणेश मूर्ती पेण मधून परदेशात पाठवल्या जातात.
मात्र, यंदा वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे तयार झालेल्या मूर्ती गोदामांमध्येच पडून आहेत, ज्यामुळे मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. युद्धामुळे सागरी मार्गातील धोके वाढल्याने विम्याचा हप्ता आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागल्यास वाहतुकीचा खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संकटामुळे गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमधील कुंभार समाज आणि व्यावसायिक मोठ्या चिंतेत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर