बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट
बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट
मुंबई - महाराष्ट्र राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेची गोष्ट आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. लाडकी बहीण’ या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला दिनाच्या निमित्तानं ही घोषणा करण्यात आली. ‘१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमात अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत सुरेखा कुडची , उषा नाडकर्णी , उषा नाईक , गौतमी पाटील , रुक्मिणी सुतार , सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
शीतल शिंदे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद गणेश शिंदे यानं लिहिले आहे. ‘सरकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांच्या आयुष्यात काय बदल घडतात, त्या एकत्र येऊन आपला संसार आणि भविष्य कसं घडवतात, याची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant