श्री संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाचे आयोजन
श्री संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाचे आयोजन
मुंबई - श्री संतसेना स्मारक मंडळ, मुंबई यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि. 20 ऑगस्ट 2025, बुधवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. दादर (पश्चिम) येथील श्री संतसेना महाराज सभागृह, इराणी मंझील, सेनापती बापट मार्ग येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मंडळाच्या परंपरेप्रमाणे यंदाही समाजबांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
खालीलप्रमाणे आहे:
- हसकाळी 11.00 ते दुपारी 1.00 - श्री सत्यनारायण महापूजा
- हदुपारी 2.00 ते 3.00 - स्व. बळवंतराव क्षीरसागर अध्यात्म केंद्रातर्फे गीता पारायण
- हसायंकाळी 3.00 ते 5.00 - महिला भजन
- हसायंकाळी 5.00 ते 6.00 - समाजातील गुणवंत हविद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम
- सायंकाळी 6.00 ते 8.00 -विद्यार्थी गुणगौरव समारंभ
- हरात्री 8.30 - स्नेहभोजन
प्रमुख पाहुणे:
श्री. प्रशांत सकपाळ (उद्योजक), श्री. मुकुंद महाले (लेखक), श्री. गोविंदराव मोहिते (राष्ट्रीय मिल मजदूर संघ), श्री. दत्ता अनारसे (महाराष्ट्र नाभिक महामंडळ, ठाणे), श्री. मनीष चव्हाण (मा. नगरसेवक), सौ. नम्रता भोसले-जाधव (मा. नगरसेविका), श्री. सुनील पवार (उद्योजक), श्री. जीवन यादव (संपादक - बालविकास मंदिर) आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
विशेष सूचना:
- हसन 2024 मध्ये इयत्ता 4 थी ते पदवी व पदविका इत्यादी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत आपली गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत मंडळाच्या कार्यालयात जमा करावी.
- हफक्त उपस्थित विद्यार्थ्यांनाच पारितोषिक देण्यात येईल, याची पालकांनी नोंद घ्यावी.कलावंत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नावे 15 ऑगस्टपूर्वी सविस्तर माहितीसह सादर करावीत.
- हश्री संतसेना स्मारक मंडळाचे सभासदत्व घेण्याचे तसेच शैक्षणिक निधीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हटीप - कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व समाजबांधव आणि विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष सहकार्य: अनंत कदम, मोतीराम जाधव, प्रदीप पवार, अरविंद क्षीरसागर, दत्तात्रय चव्हाण, कमलाकर मोहिते, अशोक कदम, सुरेश जाधव, विलास चव्हाण (A.घ् ), अशोकराव झिंजे, चित्रा पवार, शांताराम कदम, सहकार्य सचिन शिंदे, तुषार चव्हाण, रमेश पवार, सुनीता चव्हाण, सत्यवान भोसले, प्रमोद कदम, प्रमोद पाटील
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade