काँग्रेसचे माजी मंत्री यांचा भाजपामध्ये प्रवेश
काँग्रेसचे माजी मंत्री यांचा भाजपामध्ये प्रवेश
परभणी - जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. वरपुडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर, आ. तानाजी मुटकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, अमर राजुरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून विकसित भारत आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवून, प्रत्येक क्षेत्रात राज्याला अव्वल बनवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या श्री. वरपुडकर यांच्या पक्षप्रवेशाने परभणी जिल्ह्यात भाजपा संघटना अधिक मजबूत होईल. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपामध्ये सन्मान राखला जाईल अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.
यावेळी महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की सहकार क्षेत्रातील कार्य आणि समाजकार्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात चार दशकांपासून ठसा उमटवणारे श्री. वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशाने पक्ष संघटनेला बळ मिळेल.
भाजपाच्या विकासनीतीला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री. वरपुडकर म्हणाले. सर्वांच्या साथीने भाजपाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीस हातभार लावण्याचा संकल्प श्री. वरपुडकर यांनी केला.
भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा परिषद माजी सभापती परभणी धोंडीराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रेरणा वरपुडकर, माजी समाजकल्याण सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य तुळशीराम सामाले, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर कटिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदींचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade