प्लास्टिकला नाही म्हणा!
प्लास्टिकला नाही म्हणा!
मुंबई – मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि लाखो लोकांचे स्वप्नांचे शहर आहे. मात्र, वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच प्लास्टिक प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. प्लास्टिकचा अमर्यादित वापर आणि त्याची चुकीची विल्हेवाट यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. प्लास्टिकचा कचरा शेकडो वर्षे टिकून राहतो आणि त्यामुळे हवा, पाणी आणि माती दूषित होतात. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर, रस्त्यांवर आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साचतो, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर आणि निसर्गावर विपरीत परिणाम होतो. ही समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) घनकचरा व्यवस्थापन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.
मुंबईतील प्लास्टिक प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी BMC घनकचरा व्यवस्थापन विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) निर्देशानुसार, BMC ने एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर कठोर बंदी लागू केली आहे.याशिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका शहरात ४६ कोरडा कचरा संकलन केंद्रे चालवते, जिथे कोरड्या कचऱ्याचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते आणि प्लास्टिक पुनर्वापरासाठी पाठवले जाते.प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि पुनर्वापर करण्यासाठी BMC विविध स्वयंसेवी संस्थांसोबत सहकार्य करते. BMC नियमितपणे दुकाने आणि आस्थापनांची तपासणी करते, प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्यास दंड आकारते आणि जप्तीची कारवाई करते.
2024 मध्ये, BMC ने 44,448 दुकाने आणि आस्थापनांची तपासणी करून 2,148 किलो प्लास्टिक जप्त केले. प्लास्टिक बंदीबद्दल जनजागृती करण्यासाठी BMC शाळा, सोसायट्या आणि बाजारपेठांमध्ये माहितीपट, कार्यशाळा आणि प्रचार अभियान राबवते. नागरिकांना प्लास्टिकमुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. जानेवारी २०२५ मध्ये, BMC ने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत, विविध आस्थापनांवर छापे टाकून ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
प्लास्टिक मुक्त मुंबईसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर उत्पादनांऐवजी पर्यावरणपूरक पर्याय निवडायला हवेत. कचर्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वेगळा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना प्लास्टिकमुक्त पर्याय स्वीकारण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.
प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आज आणि आत्ताच प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. जर प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत छोटे बदल केले, तर मोठा परिणाम साधता येईल. BMC घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊया आणि मुंबईला प्लास्टिकमुक्त बनवूया.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade