मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार, या कलाकारांना जीवनगौरव
मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार, या कलाकारांना जीवनगौरव
मुंबई -‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे 2025 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.
पुरस्कार वितरण कार्यक्रम
१४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्य मंदिर,माटुंगा इथं हा सोहळा पार पडणार आहे.हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्रीआशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसंच उद्योगमंत्री , अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
व्यावसायिक नाट्य पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट लेखक सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (नाटक : उर्मिलायन),
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अद्वैत दादरकर (नाटक : शिकायला गेलो एक),
- सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये (नाटक : असेन मी नसेन मी),
- सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे (नाटक : मास्टर माइंड),
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार निषाद गोलांबरे (नाटक : वरवरचे वधुवर),
- सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार राजेश परब (नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची),
- सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक असेन मी नसेन मी (संस्था : स्क्रीप्टज क्रिएशन),
- सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी (नाटक : वरवरचे वधुवर),
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रशांत दामले (नाटक : शिकायला गेलो एक),
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हृषीकेश शेलार (नाटक : शिकायला गेलो एक),
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुलकर्णी नाटक : असेन मी नसेन मी),
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शर्मिला शिंदे (नाटक : ज्याची त्याची लव स्टोरी),
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शुभांगी गोखले (नाटक : असेन मी नसेन मी)
- अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार निहारिका राजदत्त (नाटक : उर्मिलायन),
- नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार श्री. सुशांत शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
- प्रायोगिक नाट्य पुरस्कारासाठी पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत आनंदमठ (संस्था : कल्पक ग्रुप, पुणे),
- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक मिडिआ (संस्था : रुद्रेश्वर, गोवा),
- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक मुकुल ढेकळे (सं. नाटक : मून विदाऊट स्काय),
- सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार यशवंत चोपडे (सं. नाटक : ब्लँक इक्वेशन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पूनम सरोदे (सं. नाटक : वेटलॉस)
- प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (सं. नाटक : संगीत अतृप्ता)
- प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे ( सं. नाटक : संगीत आनंदमठ),
- प्रायोगिक सर्वोत्कृष्ट नाटक लेखक डॉ. सोमनाथ सोनवळकर (सं. नाटक : द फिलिंग पॅरोडॉक्स) यांची निवड करण्यात आली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade