डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखलटाउन, सिएरा लिओन —

धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद खपवून घेणार नाहीत. दहशतवादाविरोधात भारताच्या पूर्णपणे पाठिशी आहोत, असे आश्वासन सिएरा लिओनचे उपसंरक्षण मंत्री निवृत्त कर्नल मोअना ब्रिमा यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे सदस्य असलेल्या सिएरा लिओनने भारताला दिलेला पाठिंबा महत्वाचा मानला जात आहे.
यूएई आणि काँगो प्रजासत्ताक या देशांच्या दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखल झाले. आफ्रिकन युनियनमध्ये सिएरा लिओनना विशेष स्थान आहे. त्यांनी दहशतवादाविरोधात एकत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे. आज खासदार डॉ. शिंदे आणि शिष्टमंडळाने सिएरा लिओनचे उपसंरक्षण मंत्री निवृत्त कर्नल मोअना ब्रिमा यांची भेट घेतली. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, सिएरा लिओनलाही भारतासारख्याच वेदना जाणवतात. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये जे घडले, त्याबद्दल ते खूप सहानुभूतीने विचार करत आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सिएरा लिओन भारतासोबत खंबीरपणे उभा आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला असून सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन या दहशतवादाविरुद्ध लढा दिला पाहिजे, असे मत उपसंरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी आणि ते का आवश्यक होते याविषयी माहिती दिली. गेल्या चार दशके मातृभूमीवर चालू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने काय-काय सहन केले आहे. त्यांना हे चांगलेच उमगले आहे की फक्त भारतच नव्हे तर उद्या ते स्वतःही दहशतवादाचे बळी ठरू शकतात. त्यामुळे आता एकत्र येण्याची वेळ आहे आणि या दहशतवाद पसरवणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या देशांविरोधात एकजूट होऊन आवाज उठवण्याची गरज आहे, अशी भूमिका एकमुखाने घेण्यात आली.
सिएरा लिओन हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या भूमिका संयुक्त राष्ट्रांत महत्व आहे. या दहशतवादी घटना ते प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर ते जोरदार निषेध करणार असून धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद खपवून घेणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. सिएरा लिओनसारख्या देशांनी अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करण्यासाठी एका समान व्यासपीठावर यावे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की सिएरा लिओन भारतासोबत ठामपणे उभा राहील, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ तेथील संसदेचे सभापती सेगेपोह सोलोमन थॉमस, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक अब्दुलाई क्लौकेर आणि प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.

संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade