पहलगाम हल्ल्यातील मृतांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी
पहलगाम हल्ल्यातील मृतांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 26 जणांना ‘शहीद’ (Martyr status) चा दर्जा देण्याची गुरवारी मागणी केली आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी हे भावनिक आवाहन केले.
राहुल गांधी यांनी ‘x’ वर लिहिले की, “पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबांच्या दुःखात, शहीद दर्जाच्या त्यांच्या मागणीत, मी त्यांच्यासोबत उभा आहे. पंतप्रधानांना विनंती आहे की, या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना हा सन्मान देऊन त्यांच्या कुटुंबांच्या भावनांचा आदर करावा.”
नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी हल्ल्यातील मृतांना थंड डोक्याने मारल्याचा आरोप करत, त्यांना शहीद दर्जा मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. “हा मुद्दा जात-जनगणनेपेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे,” असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं की, पंतप्रधान मोदींना त्यांनी या मागणीसाठी विशेष अधिवेशनासाठीचे पत्र लिहिलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही संजय द्विवेदी यांच्याशी संवाद साधून ही मागणी रास्त असल्याचं मान्य केलं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade