जगातील पहिल्या ‘सुसाईड मशीन’च्या मदतीने महिलेने केली आत्महत्या
जगातील पहिल्या ‘सुसाईड मशीन’च्या मदतीने महिलेने केली आत्महत्या
वॉशिंग्टन - आरोग्य क्षेत्रात उत्तुंग संशोधन करून वैज्ञानिकांनी अनेक असाध्य आजारांवर मात करण्याचे तंत्र विकसित केले आहे. मात्र माणसाला अद्याप मृत्यूवर मात करता आलेली नाही. मात्र मृत्यू सुखकर व्हावा यासाठी जगभरातील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. यातीलच एक विचित्र प्रयोग म्हणजे सुसाईड मशीनचा शोध. या मशिनच्या मदतीनेच आज एका महिलेने मृत्यूला जवळ केले आहे. अमेरिकेतील एका ६४ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्राच्या (सुसाईड मशीन) साह्याने आत्महत्या केली. या यंत्राच्या साह्याने आत्महत्या करणारी ती जगातील पहिली व्यक्ती ठरली आहे.
मात्र, या महिलेच्या मृत्यूनंतर स्वित्झर्लंडमध्ये पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले आहे.स्वित्झर्लंड-जर्मनी सीमेजवळील जंगलात या महिलेने यंत्राच्या साह्याने आत्महत्या केली. या यंत्राला ‘टेस्ला ऑफ इथुनेशिया’ या नावानेही ओळखले जाते. या प्रकरणी काही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ेय एका डच वर्तमानपत्राच्या छायाचित्रकाराचा समावेश आहे. या छायाचित्रकाराला आत्महत्या करतानाचे चित्रण करायचे होते, अशी माहिती स्वित्झर्लंडच्या पोलिसांनी दिली.स्वित्झर्लंड हा अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे परदेशी व्यक्तींना इच्छामृत्यूची कायदेशीर परवानगी मिळू शकते.मात्र त्यासाठीची प्रक्रिया निश्चित केली गेली आहे. टेस्ला ऑफ इथुनेशियाला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही,असे आरोग्यमंत्री एलिझाबेथ बॉम-श्नायडर यांनी सांगितले.
मात्र, या महिलेच्या मृत्यूनंतर स्वित्झर्लंडमध्ये पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले आहे.स्वित्झर्लंड-जर्मनी सीमेजवळील जंगलात या महिलेने यंत्राच्या साह्याने आत्महत्या केली. या यंत्राला ‘टेस्ला ऑफ इथुनेशिया’ या नावानेही ओळखले जाते. या प्रकरणी काही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ेय एका डच वर्तमानपत्राच्या छायाचित्रकाराचा समावेश आहे. या छायाचित्रकाराला आत्महत्या करतानाचे चित्रण करायचे होते, अशी माहिती स्वित्झर्लंडच्या पोलिसांनी दिली.
स्वित्झर्लंड हा अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे परदेशी व्यक्तींना इच्छामृत्यूची कायदेशीर परवानगी मिळू शकते.मात्र त्यासाठीची प्रक्रिया निश्चित केली गेली आहे. टेस्ला ऑफ इथुनेशियाला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही,असे आरोग्यमंत्री एलिझाबेथ बॉम-श्नायडर यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade