गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यावरील (GMLR) पुलाच्या कामामुळे बाधित होणारी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती
गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यावरील (GMLR) पुलाच्या कामामुळे बाधित होणारी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती
मुंबई - गुरूवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास ‘टी’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १८ तास पूर्णपणे राहणार बंद*
‘टी’ विभागातील नागरिकांनी पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यावरील (GMLR) पुलाच्या कामामुळे १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे ‘टी’ विभागामध्ये मॅरेथॉन मॅक्सिमा इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळविण्यात येणार आहे. १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम गुरूवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ते शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान ‘टी‘ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १८ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.
‘टी’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणाऱया परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –
गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्यालगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल. बी. एस. रोड) लगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), जवाहरलाल नेहरु मार्ग (जे. एन. रोड), देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग (एम. जी. रोड), एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव, इत्यादी. (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळः २४ तास) (पाणीपुरवठा बंद राहणार)
कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर