ध्वजारोहणासाठी अदिती तटकरे रायगडात, गिरीश महाजन नाशिकमध्ये
ध्वजारोहणासाठी अदिती तटकरे रायगडात, गिरीश महाजन नाशिकमध्ये
मुंबई - भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नाशिक आणि रायगड मध्ये पालकमंत्रिपदावरून अद्याप तिढा सुटलेला नाही त्यामुळे तिथे ध्वजारोहण कोणी करायचे या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले. रायगडात आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार असून शिवसेना शिंदे गटाच्या हट्टाला पुन्हा एकदा बाजूला सारण्यात आले आहे.
राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :-
ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, बीड- अजित आशाताई अनंतराव पवार, नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे, अहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे – पाटील, गोंदिया- छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ, सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील, नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन, पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक, जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील, अमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसे, यवतमाळ- संजय प्रमिला दुलिचंद राठोड, रत्नागिरी- उदय स्वरुपा रवींद्र सामंत, धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल, जालना- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, नांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावे, चंद्रपूर- डॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईके, सातारा- शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई, मुंबई उपनगर- ॲड.आशिष मिनल बाबाजी शेलार, वाशिम- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे, रायगड- आदिती वरदा सुनिल तटकरे, लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले, नंदुरबार- ॲड.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे, सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे, हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ, भंडारा- संजय सुशिला वामन सावकारे, छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील), सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे, अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर, कोल्हापूर- प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर, गडचिरोली- ॲड.आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल, वर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर आणि परभणी- मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर.
राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात यावे, असेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे