बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस , शेतीचे मोठे नुकसान…
बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस , शेतीचे मोठे नुकसान…
बुलडाणा – बुलडाणा जिल्ह्यातील चिखली आणि सिंदखेडराजा तालुक्यात पुन्हा काल रात्री अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुकयात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने अचानक पणे पूर परिस्थिती निर्माण झाली.
यामध्ये पिंपळगाव सोनारा येथील ओढ्याला पूर आल्याने रात्रीपर्यंत या गावाचा संपर्क तुटलेला होता तसेच शाळकरी विद्यार्थी ही या पावसामुळे अडकल्याचे वृत्त असून प्रशासनाच्या सहकार्याने पूर कमी झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना आपापल्या ठिकाणी पोचविण्यात आले.
सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी,मोहाडी, सवडद, राताळी, तांदुळवाडी, मोहखेड, माळखेड, हिवरा गडलिंग या संपूर्ण भागामध्ये रात्र आणि दिवस पाऊस सुरू असल्याने मोठे अतिवृष्टी झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला याबाबत तात्काळ पंचनामे करण्याचे आधी दिले आहेत, मात्र वृत्त लिहेपर्यंत कोणतीही अधिकारी कर्मचारी गावात आले नसल्याची माहिती आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे