‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल!
‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल!
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB)’च्या इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्सचे उपाध्यक्ष अजय भूषण पांडे यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी विविध प्रकल्प आणि सहकार्याच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भारताच्या ‘$5 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेचा सिंहाचा वाटा उचलेल. यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेऊन विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी अनेक वित्तीय संस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. यावेळी AIIB सारखी संस्था स्वतःहून महाराष्ट्राच्या क्षमता ओळखून राज्याच्या पाठीशी असल्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.
राज्यातील 9 मोठे प्रकल्प नीती आयोग व वित्त मंत्रालयाला सादर करण्यात आले आहेत. राज्यामध्ये नदीजोड प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात आखणी करण्यात आली आहे, त्यासाठी सुद्धा वित्तसहाय्य लागणार आहे. राज्यात पाच नदी जोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. वैनगंगा–नळगंगा–पैनगंगा प्रकल्प शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे, तर दमणगंगा–गोदावरी प्रकल्पातून समुद्रात वाहणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. 1 लाख मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत निर्मितीच्या पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी खासगी कंपन्यांना AIIB बँकेशी जोडले जाणार आहे.
दरवर्षी 3–4 लाख सौर कृषीपंप बसवण्याच्या योजनेसाठीही आर्थिक सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याशिवाय मेट्रो, भुयारी मार्ग, कोस्टल रोडसारख्या शहरी दळणवळण प्रकल्पांनाही गती देण्यात येणार आहे.
यावेळी अजय भूषण पांडे यांनी आशिया आणि अन्य देशांमध्ये चालू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यासोबतच महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या व भविष्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर