असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस मुंबई सीएसटी येथील मेळावा जल्लोषात.
असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस मुंबई सीएसटी येथील मेळावा जल्लोषात.
मुंबई - असंघटित कामगारांना त्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने व ताकदि ने संघर्ष करण्याचे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी केले .मार्गदर्शनपर भाषणामध्ये त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली फेरीवाले, घरेलू कामगार, छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, तसेच ओला, उबेर, झोमॅटो, ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर काम करणारी कामगार यांच्या मागण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. कामगार कायद्याचे उल्लंघन केले जाते, न्याय मागणाऱ्या कामगारांना राज्य सरकार न्याय देत नाही, नुसते खोटे आश्वासन देत आहे.
त्यांनी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामगारांनी काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के के सी च्या अध्यक्षा श्रीमती. नीता महाडिक होत्या. त्यांनी मुंबई महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या कामा हॉस्पिटल मधील कंत्राटी कामगारांची व्यथा मांडली. येथील कामगारांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन देण्यात आले नाहीत, त्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरला जात नाही व कामगारांना कामावर येऊ नये असे सांगण्यात येत आहे असे त्या म्हणाल्या.
इंटक कामगार नेते, केकेसी चे वरिष्ठ उपाध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे सेक्रेटरी श्री अनिल गणाचार्य म्हणाले की मुंबई व महाराष्ट्र राज्य मध्ये कामगार कायदे धाब्यावर बसविले जात आहेत. नवीन चार कायदे संमत करण्यात आले आहे. जे कामगारांविरुद्ध आहे व मालकांना फायदेशीर आहेत.
असंघटित कामगारांना केव्हाही बेकायदेशीरपणे कामावरून काढण्यात येते, फेरीवाल्यांना परवाना असताना देखील महापालिका व पोलीस खात्याकडून त्रास दिला जातो.
असंघटित कामगारांना एकजूट करून काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आणून केकेसीच्या संघटना मजबूत करण्याचे त्यांनी आवाहन केले.
श्रीमती. अजंता यादव माजी नगरसेविका व माजी मुंबई महिला अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करते वेळेस महागाईचे प्रश्न मांडले व सत्ताधारी पक्ष समाजामध्ये दुफळी करण्यात दंग असून गरीब व सर्वसाधारण जनतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे