देशातील सर्वांत मोठ्या FMCG कंपनीच्या MD आणि CEO पदी महिलेची नियुक्ती
देशातील सर्वांत मोठ्या FMCG कंपनीच्या MD आणि CEO पदी महिलेची नियुक्ती
मुंबई - भारतातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कंपनीने पहिल्यांदाच MD आणि सीईओ पदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती झाली आहे. प्रिया नायर यांनी इतिहास घडवला आहे. नायर या 1 ऑगस्ट 2025 रोजी पदाचा कारभार स्वीकारतील. सध्याचे एमडी रोहित जावा यांचा कार्यकाल अत्यंत कमी राहिला. ते दोन वर्षांपासून या पदावर होते. HUL च्या इतिहासात त्यांचा कार्यकाळ कमी होती. त्यांच्यानंतर आता कंपनीने प्रिया नायर यांची या उच्च पदावर नियुक्ती करण्याची घोषणा केली. प्रिया नायर यांनी 1995 मध्ये HUL मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी कंपनीत होम केअर, ब्युटी अँड पर्सनल केअर आणि वेलबीईंग पोर्टफोलियोत अनेक पदावर काम केले आहे. सध्या त्या युनिलिव्हिरच्या ग्लोबल टीममध्ये आहेत. त्या ब्युटी अँड वेलबीईंग बिझनेस ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. कंपनीचे हे युनिट जवळपास 12 अब्ज युरोची उलाढाल करते. यामध्ये हेअर केअर, स्कीन केअर, हेल्थ सप्लीमेंट्स आणि प्रिमियम ब्युटी प्रोडक्ट्स यांचा समावेश आहे.
HUL चे चेअरमन नितीन परांजपे यांनी प्रिया नायर यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी कंपनीत चांगले काम केले आहे. त्यांना भारतीय बाजाराची चांगली समज आहे. त्यांच्या नेतृत्वात कंपनी मोठी झेप घेईल असा विश्वार परांजपे यांनी व्यक्त केला. महिलेकडे कंपनीची धुरा देण्याच्या या निर्णयाचे उद्योग जगतातून स्वागत होत आहे. नायर यांच्यामुळे कंपनी मोठी प्रगती करेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ही भारतातील सर्वात मोठी फास्ट-मव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या कंपनीची उलाढाल 60,680 कोटी रुपये इतकी होती. बाजारातील कंपनीचे भांडवल 5.69 लाख कोटींहून अधिक आहे. कंपनीकडे 50 हून अधिक ब्रँड्स आहेत. यामध्ये लक्स, लाईफबॉय, सर्फ एक्सेल, रिन, व्हील, डव, व्हॅसलीन, पाँड्स लॅक्मे, क्लीनिक प्लस, ब्रुक बाँड, हॉर्लिक्स आणि किसान यासारख्या ब्रँडचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर