महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती
मुंबई - राज्यशासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (MPSC) राजीव निवतरकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन तीन नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, राजीव निवतकर आणि महेंद्र वारभुवन यांनी आज सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली .
आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात हा शपथविधी सोहळा पार पडला.या प्रसंगी आयोगाचे सदस्य अभय वाघ आणि सतिश देशपांडे यांच्यासह आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात, सहसचिव तथा परीक्षा नियंत्रक सरीता बांधेकर- देशमुख, उपसचिव मा. पां. जाधव हे उपस्थित होते.
नव नियुक्त सदस्यांची माहिती
राजीव निवतकर IAS 2010
हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी असून यांनी विविध महत्वाच्या पदांवर कामगिरी केली आहे. खाली त्यांच्या प्रमुख पदांची माहिती दिली आहे:
संचालक :आपत्ती व्यवस्थापन.
सहसचिव: मुख्य सचिव कार्यालय.
मुंबई जिल्हाधिकारी (कलेक्टर, मुंबई सिटी):
आयुक्त: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन
संचालक: विमान चालन
महेंद्र ब. वारभुवन (M. B. Warbhuvan) IAS 2010
हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांनी प्रशासनात पार पाडलेल्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे
सचिव: महाराष्ट्र राज्य कृषी परिषद पुणे,
मुख्य कार्यकारी अधिकारी: जिल्हा परिषद पालघर
सहसचिव: सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,
अतिरिक्त आदिवासी आयुक्त :ठाणे विभाग,
आयुक्त: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) तथा सचिव प्रवेश नियामक प्राधिकरण, मुंबई.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे