मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी अवनीश सिंग
मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी अवनीश सिंग
मुंबई - मुंबई विभागीय काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी आज अवनीश सिंग यांची नियुक्ती करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी अवनीश सिंग यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक अशरफ आझमी, मोहसीन हैदर, बब्बू खान, अजंता यादव, राजपती यादव, निजामुद्दीन राईन आदी नेते उपस्थित होते.
“काँग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. उत्तर भारतीय समाज नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठिशी उभे राहिला आहे व काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांना मुंबईत मान सन्मान दिला आहे. आमदार, खासदार, मंत्रीपदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदही दिले पण काही स्वार्थी लोकांनी पदाचा स्वतःच्या लाभासाठी फायदा करून घेतला व समाजाला मात्र लाभापासून वंचित ठेवले. मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या उत्तर भारतीयांना काँग्रेस पक्षानेही हात दिला, आधार दिला. हॉकर्स पॉलीसी बनवली, उत्तर भारतीय भवन बनवले, त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे नेहमीच खुले राहिले आहेत. काही लोकांनी काँग्रेस पक्ष सोडला असला तरी त्यामुळे पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही. आजही उत्तर भारतीय समाज काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा आहे”, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar