CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार
CBSE Class 10th Exams : 2026 पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना आज सीबीएसईने (CBSE) मान्यता दिली असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज (Sanyam Bhardwaj) यांनी दिली आहे. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील बोर्ड परीक्षेला बसणे अनिवार्य असेल, तर दुसरा टप्पा पर्यायी असणार आहे.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेचा निकाल जूनमध्ये लागेल, अशी माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापन केवळ एकदाच घेतले जाणार असल्याचेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरा टप्पा मे महिन्यात आयोजित केला जाणार आहे. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे पहिल्या टप्प्यात गुण कमी आले, तर तो दुसऱ्या टप्प्यात परीक्षा देऊन चांगली कामगिरी करू शकतो.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (NEP) शिफारस करण्यात आलेल्या वर्षातून दोन वेळा दहावीच्या परीक्षा घेण्याच्या नियमांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट फायदा आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर