मुंबई ही ठाकरे यांच्या शिवसेनेचीच
मुंबई ही ठाकरे यांच्या शिवसेनेचीच
मुंबई - मुंबई मधील मराठी आणि हिंदु बांधवांचे रक्षण मातोश्रींची अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच करील असे ठणकावून सांगतानाच मुंबई ही ठाकरे यांच्या शिवसेनेचीच असल्याचा आत्मविश्वास ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपल्या घणाघाती भाषणात व्यक्त केला. शिवसेना शाखा क्रमांक १२/१४ आणि सौ. रेखा बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या स्त्री सन्मान औद्योगिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेच्या ५९ वा वर्धापन दिनानिमित्त निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहोळा आयोजित करण्यात आला होता. या सोहोळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी हे बोलत होते. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे, रोहिणी चौगुले, मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य शशिकांत झोरे, संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे, शाखाप्रमुख सचिन मोरे, अभिलाष कोंडविलकर, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजू देसाई, घर हक्क समिती अध्यक्षा मोहिनी अणावकर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित दादासाहेब शिंदे, माजी शाखाप्रमुख राजा खोपकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपल्या सुमारे दीड तासाच्या घणाघाती भाषणात योगेश वसंत त्रिवेदी यांनी मुंबई प्रांत, मुंबई इलाखा, द्विभाषिक राज्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित होणारी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका आणि त्यात प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान, मार्मिक चा प्रारंभ, शिवसेनेची स्थापना, सामना चा उदय, बाबरी चे पतन, हिंदुत्वाचा ज्वालाग्राही हुंकार, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या, हिंदुत्वासाठी गेलेला मताधिकार, कॉंग्रेस, मुस्लिम लीग, प्रजा समाजवादी पक्ष यांना दिलेले समर्थन, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, स. गो. बर्वे, ताराबाई सप्रे, मुरली देवरा या कॉंग्रेस उमेदवारांना अनुक्रमे राष्ट्रपती, लोकसभा निवडणूक, लोकसभा पोटनिवडणूक, मुंबई चे महापौर पद यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला पाठिंबा, शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस यांच्या समवेत शिवतीर्थावर घुमलेला दसरा मेळाव्यातील दणदणीत आवाज, नरेंद्र मोदींना अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवून दिलेले अभयदान, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा वेगवेगळ्या प्रसंगी करुन घेतलेला फायदा आदी विषयांवर सविस्तर भूमिका परखडपणे मांडली. मुंबई ही अनेकांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटते म्हणून अनेकजण टपून बसलेले आहेत. परंतु मुंबई मधील तमाम मराठी बांधवांचे, हिंदु बांधवांचे रक्षण केवळ आणि केवळ मातोश्रींची अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच करु शकते. १९९२-९३ च्या दंगलीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने हे दाखवून दिले आहे म्हणूनच मुंबईतील गुजराती बांधवांनी गिरगांव चौपाटी जवळ असलेल्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचा गौरव करुन त्यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी बहाल केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे तर मग दुसरा पर्याय असूच शकत नाही, असेही योगेश वसंत त्रिवेदी यांनी सुस्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे प्रणेते विजय वैद्य यांच्या धर्मपत्नी वैशाली विजय वैद्य यांना तसेच वसंत सावंत, वसंत तांबे, नंदकुमार शिवलकर आदी निष्ठावंत शिवसैनिकांना शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर