मंडणगड एसटी आगारात ५ नव्या बस,राज्य मंत्री योगेश कदम यांनी केला प्रवास
मंडणगड एसटी आगारात ५ नव्या बस,राज्य मंत्री योगेश कदम यांनी केला प्रवास
रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खेड आगार रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांची जागा घेण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ५ एसटी बसेसचा ताफा आज मंडणगड एसटी आगारात सेवेत दाखल करण्यात आला. या नव्या बसेसचे लोकार्पण मंडणगड आगारात मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे मंडणगड व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळणार आहे.
परिवहन विभागामार्फत पुढील टप्प्यात कोकणासाठी आवश्यक असलेल्या मिनी बसेसचा ताफा लवकरच जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे खेडोपाडी आणि दुर्गम भागातील प्रवास अधिक सोयीचा व जलद होईल, अशी माहिती यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
कोकणातील शेवटच्या गावापर्यंत वाहतूक सेवा पोहोचवण्यासाठी नव्या बसेसचा ताफा ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात मिनी बसेसचाही ताफा उपलब्ध करून देण्यात येईल असं देखील राज्यमंत्री कदम यावेळी म्हणाले.
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, महिला समन्वयक अस्मिता केंद्रे, उपतालुका प्रमुख सुरेश दळवी, हरिश्चंद्र कोदेरे, शिवसेना विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, संजय शेडगे, दीपक मालुसरे, आनंद भाटे, शहर प्रमुख गटनेते विनोद जाधव, युवासेना कोकण निरीक्षक चेतन सातोपे, तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी मंडणगड तालुका कार्यकारिणी, सरपंच, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, माजी व सध्याचे पदाधिकारी, महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या बसेसच्या समावेशामुळे स्थानिक प्रवाशांसाठी अधिक सक्षम, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar