अल्पावधीतच खर्डी- नेवाळी रायगड रस्ता बंद ठेवण्याची वेळ रायगड प्राधिकरणावर!
अल्पावधीतच खर्डी- नेवाळी रायगड रस्ता बंद ठेवण्याची वेळ रायगड प्राधिकरणावर!
किल्ले रायगड - किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतानाच सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी नगरभवन नेवाळी वाडी ते किल्ले रायगड हा मार्ग काढण्यात आला मात्र हा मार्ग वर्षभरातच बंद ठेवण्याची पाळी रायगड प्राधिकरणाच्या प्रशासनावर आली. असून या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार मात्र मालामाल झाला असून अधिकारी मात्र याबाबत निवृत्त असल्याचे त्या कार्यालयात चौकशी केली असता पाहण्यास मिळाले.
किल्ले रायगडकडे जाण्यासाठी महाड रायगड हा २४ किमी चा रस्ता अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता नव्याने माणगाव निजामपूर किल्ले रायगड आणि महाड रायगड मार्गाच्या खर्डी गावापासून नेवाळी हिरकणीवाडी ते रायगड असा एक नवा मार्ग सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षभरापूर्वी या मार्गाचे काम झाले त्याच वेळेस मार्गाची अवस्था बघून स्थानिक नागरिकांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
या मार्गावरील नगर भवन पासून नेवाळीपर्यंत असलेल्या डोंगरावर सरळ चढ आणि अरुंद वळणे देण्यात आले आहेत. यामुळे या मार्गावर मोठ्या बसेस जाणे शक्यच नाही. त्या ठिकाणी छोट्या कार, मालवाहतुकीची वाहने देखील नेताना चालकाची दमछाक झाली. ही अवस्था पाहून स्थानिक नागरिकांनी देखील या मार्गावरून वाहनांची वाहतूक करणे अपघाताचा धोका म्हणून टाळले. याबाबत रस्त्याची पाहणी करून सुधारणा करण्याची मागणी देखील करण्यात आली. मात्र रायगड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या हितासाठी स्थानिक ग्रामस्थांचे व नागरिकांचे म्हणणे न ऐकता हा रस्ता केल्याने एक वर्षभरात चार रस्ता वाहून गेला असून शासनाचे करोडो रुपये मात्र ठेकेदाराच्या खिशात गेले असून अधिकारी मात्र याबाबत गप्प असल्याचे पाहण्यास मिळाले.
महाड सार्वजनिक बांधकाम (रायगड प्राधिकरणाच्या) विभागाच्या अभियंतांनी या मार्गाची निर्मिती करताना या सगळ्या बाबी का तपासल्या नाहीत? या रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना व त्यांचे म्हणणे न ऐकता या मार्गाचे काम ठेकेदाराच्या हितासाठी करून शासनाचे लाखो रुपये पावसाच्या पाण्यात वर्षभरात गेल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र याबाबत ना रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बोलत ना प्रशासनातले अधिकारी दोघेही का गप्प आहेत असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे .
नेवाळी गावाच्या खालील बाजूला असलेल्या घाट मार्गावर तीव्र वळण आणि उतार ठेवण्यात आला आहे. याठिकाणीं आता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्ता रुंद करण्याचे काम सुरू केल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गटार आणि मोऱ्यांची कामे देखील निकृष्ट पद्धतीची झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी या तीव्र उतारा ऐवजी अन्य मार्गाचा पर्याय दिला होता मात्र स्थानिक नागरिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (रायगड प्राधिकरणाच्या) ओव्हर स्मार्ट अभियंत्यांमुळे हा मार्ग रुंद झालेला असला तरी भविष्यात देखील त्रासदायक ठरणार आहे.
नेवाळी गावापासून पुढे हा रस्ता जोडण्यासाठी आम्ही पर्याय दिला होता मात्र येथील अधिकाऱ्यांनी ऐकले नाही त्यामुळे या अवस्था निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया या गावातील स्थानिक नागरिक– यशवंत आखाडे, यांनी दिली खर्डी नेवाळेवाडी रस्ता हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केला होता की ठेकेदाराच्या हितासाठी केला होता. या रस्त्याच्या कामामुळे ठेकेदार मालामाल झाला या खात्याचे अधिकारी मालामाल झाले . केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता मनमानी पद्धतीने केलेला रस्ता कसा वाहून गेला याचे उत्तम उदाहरण खर्डी नेवाळेवाडी रस्ता असल्याची चर्चा या गावातील नागरिकांकडून प्रत्यक्ष ऐकण्यास मिळाली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे