भाडेवाढ न करता सर्व लोकल AC करण्याचा केंद्राचा विचार
भाडेवाढ न करता सर्व लोकल AC करण्याचा केंद्राचा विचार
मुंबई - मुंब्रा येथे घडलेली कालची घटना अतिशय गंभीर आहे. काही माध्यमांनी यासंदर्भात रेल्वे मंत्री संवेदनशील नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी कालच माझ्याशी पाऊण तास चर्चा केली आहे. यातल्या अडचणी आणि उपाययोजना त्यांनी मला सांगितल्या आहेत. यावर उपाय करण्यासाठी सर्व लोकल या भाडेवाढ न करता एसी करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सेवा आणि सुशासनाचे अकरा वर्षे’ या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले, यावेळी ते बोलत होते.
“एसी ट्रेन द्यायच्या आणि त्या भाडं न वाढवता द्यायचा, असा मास्टर प्लॅन सरकारकडे आहे. मेट्रोचे जाळे नसल्यामुळे लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. रेल्वे गाड्यांना दरवाजे बसवण्याचं काम सुरू आहे. लोकांना हवा खेळती राहावी यासाठी सरकार उपाययोजना करेल. लोकल गाड्यांमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल, हे सरकारला कळतं. तेवढं डिझाईन डोकं सरकारकडे आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय आहे योजना?
- २३८ नव्या एसी लोकल ट्रेन मुंबईसाठी मंजूर करण्यात आल्या आहेत.
- या ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे, चांगली वेंटिलेशन व्यवस्था आणि इंटरकनेक्टेड कोचेस असतील.
- भाडेवाढ न करता प्रवाशांना एसी सुविधा देण्याचा सरकारचा स्पष्ट उद्देश आहे.
डिझाईनमधील बदल:
- दरवाजांमध्ये लूव्हर्स (Louvres) – बंद दरवाजांमधूनही हवा खेळती राहील.
- छतावर वेंटिलेशन युनिट्स – बाहेरून ताजी हवा आत खेचण्यासाठी.
- कोचेसमध्ये व्हेस्टिब्यूल्स – प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्यात सहज हालचाल करता येईल.
वेळापत्रक:
- नोव्हेंबर २०२५ – पहिली ट्रेन तयार होणार.
- जानेवारी २०२६ – चाचणीनंतर सेवा सुरू होणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “एसी ट्रेन देणार पण भाडे वाढवणार नाही. लोकलमध्ये वाढती गर्दी लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर सरकारचा भर आहे.” त्यांनी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करून गर्दी कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे