Breaking News
अनिल अंबानींची कंपनी झाली कर्जमुक्त
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक स्थिती ढासळलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले आहे. कंपनीवर आता कोणाचेही कर्ज नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अधिकृतपणे कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज परतफेड केले. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत हे नमूद केले आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे देणे लागत नाही. कंपनीने स्वतःला कर्जमुक्त घोषित केले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीला ४,३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर