महात्मा फुले यांच्या जीवनावरील सिनेमा टॅक्स फ्री करा.
महात्मा फुले यांच्या जीवनावरील सिनेमा टॅक्स फ्री करा.
मुंबई - महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे.जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे.त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री झाला पाहिजे अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.अंधेरी येथे ना.रामदास आठवले यांच्या साठी फुले सिनेमा चे स्पेशल स्क्रिनिंग दाखवण्यात आले.फुले चित्रपट पाहिल्यानंतर न.रामदास आठवले यांनी हा चित्रपट देशभरात पोहोचला पाहिजे.त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा आणि फुले या चित्रपटाला करमुक्त करावे अशी आपली मागणी असून त्या बाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.
यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा रिपाइं चे शैलेशभाई शुक्ला; सिद्धार्थ कासारे, जतीन भुट्टा; प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले हा सिनेमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात दाखवण्यात यावा अशी विनंती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी ना.रामदास आठवले यांना केली.त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.फुले सिनेमा सर्व सिनेमागृहात दाखवण्यात यावा .सर्वांनी फुले सिनेमा जरूर पाहावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant