1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो?
1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो?
मुंबई : 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र (श्aप्arasप्tra) स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यातची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी माणसाचा आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचं स्मरण या दिवशी केलं जातं. 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामदार दिनहणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरु लागली. गुजराती भाषिकांनी स्वत:चं वेगळं राज्य हवं होतं. त्याचवेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
106 आंदोलक हुतात्मे झाले - 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते, त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुस्रया बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसांची ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे अखेर सरकारने नमते घेऊन 1 मे, 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर 1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर