लोकअदालतमधून झाली ग्रामपंचायतींची कोट्यवधीची वसुली
लोकअदालतमधून झाली ग्रामपंचायतींची कोट्यवधीची वसुली
अहिल्यानगर - लोक अदालत या उपक्रमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची कोट्यवधींची थकबाकी वसुल झाल्याच्या माहिती समोर आली आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने आयोजित केलेल्या लोक अदालतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुलीचे विक्रमी संख्येने दाखलपूर्व दावे सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंतच्या लोक अदालतमधील प्रकरणांमध्ये उच्चांकी थकबाकी वसुली ग्रामपंचायतींना मिळाली आहे. एकूण ८ कोटी ५६ लाख २७ हजार ८४४ रुपयांच्या वसुलीचे झाले आहेत.
घरपट्टी, पाणीपट्टीसह गाळेभाड्याच्या वसुलीचा त्यामध्ये समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेने आज जाहीर केली आहे. मार्चअखेरीच्या कालावधीत ग्रामपंचायतींची वसुलीसाठी मोहीम सुरू असतानाच उत्पन्नात भर घालणारी मोठी वसुली याच दरम्यान झाली आहे. त्यामुळे ग्रामनिधीत भरपडून ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गती मिळणार आहे.
जिल्ह्यातील १३२३ पैकी ११३९ ग्रामपंचायतींनी लोक अदालतमध्ये सहभाग नोंदवला. लोक अदालतीच्या नोटिसा थकबाकीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यातील १३२३ ग्रामपंचायतींचे ७ लाख २ हजार ९२२ खातेदार आहेत. त्यातील ९५ हजार ७५१ खातेदार थकबाकीत आहेत. त्यांच्या थकबाकी वसूलीचे दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यात आले होते. यातील ८४ हजार ११५ नोटीसा जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने थकबाकीदारापर्यंत अल्पावधीत पोहोचवल्या होत्या. यातील ५१ हजार १९७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सर्व करांचा मिळून ८ कोटी ५६ लाख १७ हजार ८४४ रुपयांची थकबाकी वसुल झाली आहे.
लोक अदालतच्या माध्यमातून वसुलीसाठी जिल्हा परिषदेने यंदा थकबाकीदारांपर्यंत नोटीसा पोहचवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्याच्या परिणामातून आतापर्यंतची विक्रमी थकबाकी वसुली झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर