निवृत्त फुटबॉलपटू सुनिल छेत्री करतोय पुनरागमन
निवृत्त फुटबॉलपटू सुनिल छेत्री करतोय पुनरागमन
मुंबई - भारताचा अष्टपैलू फुटबॉलपटू, माजी कर्णधार सुनिल छेत्री भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. ४० वर्षीय सुनिल १९ मार्च रोजी मालवदीवमध्ये होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यात छेत्री भारतीय संघाचा भाग असणार आहे. हा सामना AFC आशियाई चषक २०२७ च्या पात्रता फेरीचा सराव सामना म्हणून खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ २५ मार्च रोजी बांगलादेशमध्ये पात्रता फेरीचा पहिला सामना खेळणार आहे.
जून २०२४ मध्ये सुनिल छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. वर्ल्डकप पात्रता फेरीतील भारत आणि कुवेत सामना छेत्रीच्या कारकिर्दीचा अंतिम सामना ठरला. या सामन्यात सुनिल छेत्रीला गोल करण्यात अपयश आले आणि सामना पूर्णवेळ गोल शून्य बरोबरीत राहिला. छेत्री जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक आहे. ज्यावेळी त्याने निवृत्ती घेतली, त्यावेळी तो सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी चौथ्या स्थानी होता. सुनिल छेत्री १९ वर्ष फुटबॉल खेळला. त्याच्या कारकिर्दीत त्याने आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने ९४ गोल केले आहेत. तो ८८ सामने कर्णधार म्हणून खेळलाय. इंडियन सुपर १ लीगमध्ये बेंगळुरू एफसीकडून खेळणारा, लीगमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून विक्रम त्याच्या नावावर आहे. तो भारताचा सर्वाधिक वेळा खेळलेला खेळाडू आणि राष्ट्रीय संघाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू देखील आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar