राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो;
शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
सातारमध्ये 2019 मध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेतील पावसाची आठवण करून देणारी सभा आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये झाली. आज इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले. सांगलीमधील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर इचलकरंजीमध्ये शरद पवार मनद कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस आणि शरद पवार असे समीकरण जुळून आले. नेमका हाच धागा पकडत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागतो
भर पावसातील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. शरद पवारांनी जाहीर सभेत असं सांगताच समोरुन एकच जल्लोष झाला. यावेळी समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद देत शरद पवार यांच्या सभेला पावसामध्येही जाण आणली.
महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घ्यायचा आहे
पवार म्हणाले की लोकसभेत निवडणुकीनंतर आता विधानसभेचे निवडणूक होत आहे. त्यामुळे आपण कारभार कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवायचं आहे. सत्तेत बदल केल्याशिवाय पर्याय आपल्यासमोर दिसत नाही आणि सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, यापेक्षा इथे अधिक बोलावसं वाटत नाही, असे ते म्हणाले. पवार यांनी सांगितले की ही विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे अनुभव काही चांगला नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant