मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ
मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ
नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आज इगतपुरी-
त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या सभेचा मंडप अचानक उडाला. यामुळे दोन कार्यकर्ते जखमी झाले, सभा मंडप उडाल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
लकी जाधव यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी उभारण्यात आलेला मंडप वादळामुळे अचानक उडाला. सभा मंडप उडाल्यामुळे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर मंडप उडाल्यामुळे सभास्थळी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. तर हेलिपॅडवरून निघालेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा पुन्हा माघारी परतला. यानंतर मल्लिकार्जुन खरगे पुन्हा सभा स्थळी दाखल झाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar