अमेरिकन निवडणूक आणि फेड बैठकीमुळे बाजारात अस्थिरता;
अमेरिकन निवडणूक आणि फेड बैठकीमुळे बाजारात अस्थिरता; IT आणि फार्मा क्षेत्रांवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे
अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आणि FOMC, यूएस फेड बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात अमेरिकन निवडणुकांच्या निकालानंतर जागतिक बाजारात दिलासादायक वाढ दिसून आली. ट्रम्प यांच्या मजबूत जनादेशामुळे राजकीय अनिश्चितता कमी झाली. भारतीय बाजारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली.
यूएस फेडरल रिझर्व्हने गुरुवारी मुख्य व्याजदरात आणखी 25 अंकांनी कपात केली. याचा परिणाम वैश्विक बाजारावर दिसला. परंतू जागतिक बाजार आणि आयटी समभागांमध्ये वाढ होऊनही भारतीय शेअर बाजारात ,आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ,शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने आणि परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने बाजार खाली आला.
विदेशी गुंतवणूकदारांची विक्रमी मासिक विक्री आणि कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी आल्याने ऑक्टोबरमध्ये निर्देशांक जवळपास 6% घसरले.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष Q2 तिमाही निकाल,विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका(FII inflows),जागतिक घडामोडी (global cues) याकडे राहील.
पुढील आठवड्यात यूएस प्रेसिडेंट ट्रम्प काही घोषणा करू शकतात किंवा काही धोरणे देखील जाहीर करू शकतात ज्याचा थेट परिणाम आयटी आणि फार्मा ह्या दोन क्षेत्रांवर पडणार असल्याने गुंतवणूकदारानी या दोन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar