राज्यातील वर्तमान सरकार भ्रष्ट आणि असंवेदनशील
राज्यातील वर्तमान सरकार भ्रष्ट आणि असंवेदनशील
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज हिंगणघाट आणि परभणी इथे प्रचारसभा झाल्या तर उध्दव ठाकरे यांचीही प्रचारसभा बुलडाण्यात झाली . या दोघांनीही महायुतीचे सरकार भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील असल्याचा आरोप केला.
राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही, सरकारचं निर्यात धोरण योग्य नाही. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचाआरोप शरद पवार यांनी परभणी इथल्या सभेत केला. आपण कृषीमंत्री असताना, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली,असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरल्याने सरकारने राज्यात नवीन योजना आणल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातले सरकार हे असंवेदनशील राज्यातल्या इतिहासातले भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मतदारांनी या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत महायुती सरकारचा पराभव करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. मविआचे सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार, शेतमालाला हमी भाव देणार , पाच वर्षांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार यांसह मविआच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा ठाकरे यांनी यावेळी पुनोरूच्चार केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant