२८८ जागांवर महायुती संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत…
२८८ जागांवर महायुती संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत…
मुंबई, - अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न नक्कीच आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आमच्यामध्ये फारशी जागांची संख्या नाही. ९० ते ९५ टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार म्हणून उत्तम पध्दतीने काम सुरू झाले आहे. आज महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे २८८ जागांवर महायुती पूर्ण ताकदीने… संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
आमच्या अपवादात्मक संख्या एबी फॉर्मसंदर्भात आहेत. अन्य ठिकाणी अपक्ष उमेदवार हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील तर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत. एक – दोन दिवसात नाराजांची समजूत काढण्यात नक्कीच यशस्वी होऊ असेही तटकरे म्हणाले. देवळाली ही जागा राष्ट्रवादीची असून त्याठिकाणी सरोज अहिरे या आमच्या महायुतीच्या उमेदवार आहेत. हेमंत गोडसे यांच्या ज्या काही भावना असतील. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की ती समजूत काढण्यात यशस्वी होतील.
पवारसाहेबांच्या कुठल्याच वक्तव्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतानाच बारामतीची जनता सूज्ञ आहे. ३० वर्षात अजितदादांनी बारामतीत उभे केलेले प्रचंड काम बारामतीकर नव्हे तर पूणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र विसरू शकत नाही किंवा अनुभवत आहे. देशभर बारामती पॅटर्नचे कौतुक होत असते. त्यामधील अजितदादांचा जो सहभाग आहे तो सुज्ञ बारामतीकर ठरवतील की, कुणाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊ मात्र या विधानसभेत प्रचंड फरकाने अजितदादा निवडून येतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे कधी -कधी त्यांच्या पध्दतीने बोलत असतात. कधी ते विनोद करतात तर कधी मिमिक्री करतात त्यामुळे त्यांचे बोलणे त्याच अर्थाने घ्यावे. त्यापेक्षा काही वेगळे असेल असे मला वाटत नाही असा जोरदार टोला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.
कॉंग्रेसला लोकसभेला मिळालेले यश किती पध्दतीने डोक्यात गेलेले आहे आणि ते किती जमिनीवर यायला लागले आहे याचे चित्र म्हणजे कोल्हापूरमध्ये काल कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज माघारी घेतला असा खोचक टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर