राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने महाराष्ट्र विधानसभेची आणखी एक यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार, माहीम विधानसभा मतदारसंघातून आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून याबद्दलची चर्चा होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये अमित ठाकरे यांचे नाव जाहीर झाले आहे. तर वरळी विधानसभेतून ठाकरेंचे उमेदवार आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
ठाकरे घराण्यातले दुसरे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भवाया हुवाया आहेत. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे आता कशाप्रकारे माहीम मतदारसंघातली गणित फिरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत, असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं. यावेळी लोकशाही आहे...लोकशाहीमध्ये सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE