दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
नागपूर : आज नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमी (Deekshabhoomi) येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2024) साजरा केला जात आहे. त्यासाठी देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी नागपूरला दाखल झाले आहेत. 1956 मध्ये आजच्याच दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून दीक्षाभूमी येथे विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शेकडो आंबेडकरी अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन देऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची परंपरा आहे. दीक्षाभूमीला आंबेडकरी अनुयायी आपले प्रेरणास्थान मानतात. त्यामुळे देशभरातून लाखोंचा जनसमुदाय हा दीक्षाभूमीला आजच्या दिवशी आवर्जून हजेरी लावतात.
या दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी सायंकाळी ६ वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले जाणार नाही. तर दीक्षाभूमीवर यंदाही दोनशेच्यावर पुस्तकांची दुकाने लावण्यात आली आहेत. यात बुद्ध, फुले, कबीर, आंबेडकर, पेरियार या महापुरुषांवर आधारित पुस्तके आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE