या कारणांमुळे कोसळला शिवरायांचा पुतळा – चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट
या कारणांमुळे कोसळला शिवरायांचा पुतळा – चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट
ट्रेण्डिंग
मुंबई - मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गंज, कमकुवत फ्रेम व चुकीच्या वेल्डिंगमुळे कोसळला, असा ठपका चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. या अहवालामुळे छत्रपतींचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या महिन्यात कोसळला होता. याप्रकरणी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती. तसेच या समितीला 30 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने आता आपला 16 पानी अहवाल सरकार दरबारी सादर केला आहे. त्यात हा पुतळा कमकुवत फ्रेम आणि पुतळ्यात गंज चढल्यामुळे कोसळल्याचा दावा केला आहे.
भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता.चौकशी अहवालात काय म्हटलेमालवण पुतळा दुर्घटना प्रकरणात चौकशी समितीने 16 पानांचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. पुतळ्यातील गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंग कामामुळे हा पुतळा कोसळल्याचे, या अहवालात म्हटले आहे. पुतळा उभारलेले फ्रेमवर्क तितके मजबूत नव्हते. तसेच देखभाल योग्य पद्धतीने झाली नसल्याने पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता, असेही या अहवालात म्हटले आहे.अनावरणानंतर 8 महिन्यांतच कोसळला होता पुतळासिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा कोसळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांसह शिवप्रेमींचीदेखील माफी मागितली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा बांधकाम पाहणाऱ्या चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे अटक केली होती.राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपतींचा पुतळा उभारणारसिंधुदुर्गातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी साधारण 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे. तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे.सिंधुदुर्गातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE