७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
नवी दिल्ली - ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट ‘आट्टम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित ‘वारसा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘कंतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘कार्तिकेय’ 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पोनियिन सेल्वन 1’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘KGF Chapter 2’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘केजीएफ चॅप्टर 2’ ला सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कारही मिळाला. मनोज बाजपेयी यांना ‘गुलमोहर’साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला. संजय सलील चौधरी यांना कढीकन चित्रपटातील संगीतासाठी विशेष पुरस्कार मिळाला.
जाहीर झालेले राष्ट्रीय पुरस्कार…
- मल्ल्याळी चित्रपट आट्टम ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
- सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
- साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला दोन पुरस्कार
- साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार
- ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार
- सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या ‘वारसा’लाही राष्ट्रीय पुरस्कार
- वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार
- आदीगुंजन (Murmurs of the Jungle) या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपट पुरस्कार
- गायक अर्जित सिंह याला हिंदी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर
- हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी संगीतकार प्रीतम यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार
- ‘कंतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
- अभिनेत्री नित्या मेनन हिला तिरुचित्रम्बलम करिता आणि मानसी पारेख हिला कच्छ एक्स्प्रेससाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
- मल्ल्याळी चित्रपट ‘आट्टम’ला सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा पुरस्कार
- आनंद एकार्शी यांना ‘आट्टम’ करिता सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार
- फौजा चित्रपटासाठी नौशाद सदर खान यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार ‘कंतारा’ चित्रपटाला जाहीर
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता (उँचाई)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन राज मल्होत्रा (फौजा, हरियाणवी चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला)- बॉम्बे जयश्री
- बेस्ट स्टंट कोरियोग्राफी – केजीएफ 2
- बेस्ट एडिटिंग अवॉर्ड – अट्टम (मलयालम)
- बेस्ट प्रोडक्शन डिझाईन – अपराजितो
- बेस्ट बुक ऑन सिनेमा – किशोर कुमार: द अल्टीमेट बायोग्राफी (अनुराधा भट्टाचार्जी, पार्थवि धर)
- स्पेशल मेंशन (म्यूजिक मेंशन) – संजय सलील चौधरी
- बेस्ट एक्शन डायरेक्शन अवॉर्ड – केजीएफ चैप्टर 2 (अनबारिव)
- बेस्ट पार्टी – अपराजितो (सोमनाथ कुंडू)
- बेस्ट प्रोडक्शन डिझाईन – अपराजितो (आनंद आध्या)
- बेस्ट साउंड डिझाईन – पोन्नयिन सेल्वन 1 (आनंद कृष्णमूर्ति)
- बेस्ट सिनेमेटोग्राफी – पोन्नयिन सेल्वन 1 (रवि वर्मन)
- बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट – श्रीपथ (मलिकापुरम)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार आहे. याची सुरुवात 1954 मध्ये झाली. सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याचे आयोजन केले जाते. यानंतर राष्ट्रपती या पुरस्कारांचे वितरण करतात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar