Disney च्या’ मुफासा: द लायन किंग’चा हिंदी ट्रेलर रिलीज
Disney च्या’ मुफासा: द लायन किंग’चा हिंदी ट्रेलर रिलीज
मुंबई - जगप्रसिद्ध चित्रपट निर्मिती कंपनी असलेल्या Disney च्या द लायन किंग या ऍनिमेशनपटाला मोठी लोकप्रियता लाभली. लहानमुलांबरोबरच मोठ्यांना देखील या चित्रकृतीने भुरळ पाडली आहे. या चित्रपटाचा पुढील भाग मुफासा: द लायन किंग’ हा लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा हिंदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुफासा: द लायन किंग’ या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुफासाच्या भूमिकेसाठी शाहरुख खाननं आवाज दिला होता. तर सिंबासाठी मोठा मुलगा आर्यन खाननं. आता या चित्रपटातून शाहरुख खानचा मुलगा अबराम खान हा पदार्पण करणार आहे. या प्रोजेक्टमधून अबराम डेब्यू करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी डबिंग केली आहे. या चित्रपटात तो यंग मुफासाचा आवाज देणार आहे.
खान कुटुंबाव्यतिरिक्त, संजय मिश्राने पुम्बाच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे आणि श्रेयस तळपदे याने टिमॉनच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित ‘मुफासा: द लायन किंग’ हा चित्रपट यंदाच्या ख्रिसमसला इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.
डिज्नी मीडिया फ्रेंचायझीच्या या चित्रपटाच्या सीरिजचा पहिला क्लासिक अॅनिमेशन चित्रपट ‘द लायन किंग’ हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर 2019 मध्ये या चित्रपटाचा एक रीमेक बनवण्यात आला. आता तब्बल 5 वर्षानंतर त्याचा प्रीक्वल येणार आहे तर या प्रीक्वलचं नाव ‘मुफासा: द लायन किंग’ असं ठेवण्यात आलं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant