हरियाणातील खाप पंचायतीतर्फे विनेश फोगटला देण्यात येणार सुवर्णपदक
हरियाणातील खाप पंचायतीतर्फे विनेश फोगटला देण्यात येणार सुवर्णपदक
चंदीगढ - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचून केवळ १०० ग्रॅम वजनामुळे माघार घ्यावी लागलेल्या विनेश फोगटसाठी देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऑलिम्पिक कमिटीच्या विनेशबाबतच्या निर्णयाबाबत भारतीय ऑलिम्पिक महासंघाने अपिल केले आहे. यानंतरही विनेशला पदक मिळणार की नाही याबाबत निर्णय अजून झालेला नाही. मात्र, स्टार कुस्तीपटू विनेश फोगटबाबत हरियाणात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विनेश फोगट भारतात परतल्यावर भव्य स्वागत सोहळा होणार आहे. याशिवाय तिला सुवर्णपदकही देण्यात येणार आहे.
सर्व खाप पंचायतीतर्फे विनेश फोगट हिच्या संदर्भात महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या महापंचायतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विनेश फोगट मायदेशी परतल्यावर लोक तिचे भव्य स्वागत करतील. तसेच विनेश फोगटला सर्व खापच्या वतीने एका समारंभात सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.
विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात केली होती. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेश फोगटने ४ वेळा विश्वविजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही दमदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
विनेश फोगटची कामगिरी पाहता ती सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र, फायनलच्या दिवशी वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. महिलांच्या ५० किलो वजनी कुस्ती स्पर्धेत विनेश सुवर्णपदक जिंकणार हे निश्चित मानले जात होते. मात्र १०० ग्रॅम जास्त वजन असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. विनेश फोगट हिने अपात्रतेच्या निर्णयाला विरोध दर्शवत रौप्य पदकाची मागणी केली आहे. विनेशने सीएएसकडे अपील केले आहे. या प्रकरणाचा निर्णय आज (११ ऑगस्ट) येऊ शकतो. सीएएसने विनेशला तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.
विनेश ई-मेलवर उत्तर देईल. त्यानंतर CAS आपला निर्णय देईल. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण ६ पदके जिंकली आहेत. यात ५ कांस्य आणि १ रौप्य पदके आहे. विनेशला रौप्यपदक मिळाल्यास पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात एकूण ७ पदके असतील.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar