आरोप - प्रत्यारोपांचे राजकारण
आरोप - प्रत्यारोपांचे राजकारण
विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसे राजकीय नेत्यांचे आरोप - प्रत्यारोप वाढलेले दिसतात. महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता एक सनसनाटी आरोप केला आहे. मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यास सांगण्यात आले होते. मी तो आरोप केला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास सांगण्यात आले होते, पण मी ते आरोप केले नाहीत, असा सनसनाटी दावा महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केला आहे. शिवाय अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर त्यांना उत्तर देताना, माझ्याकडे क्लिप्स आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे क्लिप्स आहेत असे म्हटल्यानंतर आता अनिल देशमुखांनी थेट त्यांना आव्हान दिले आहे. हे आरोप - प्रत्यारोप वाढत जाणार आहेत, असे दिसते.
मी सांगितले होते की, फडणवीसांनी मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार विरोधात अफिडेविट करण्यास सांगितले होते. मी ते पुराव्या शिवाय बोललेलो नाही.(हातातला पेन ड्राईव्ह दाखवत) पेन ड्राईव्ह मध्ये सर्व पुरावे आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. शिवाय श्याम मानव यांनी केलेला दावा खरा असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख यांनी फडणवीसांना आव्हान देताना म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे काही क्लिप्स असल्याचा दावा केला. देशमुखांनी फडणवीसांना असेही म्हटले आहे की, त्यांनी ते क्लिपिंग जनतेसमोर आणावे. मला माहित आहे त्यांच्याकडे कुठलीही क्लिप्स नाही. त्यामुळे मी दावा करतो की, त्यांनी त्या क्लिपिंग समोर आणाव्यात. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते योग्य वेळ आल्यावर मी समोर आणेन, असे आव्हान अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.
तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अतिशय जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्या माणसाने माझे देवेंद्र फडणवीसांशी बोलणे करुन दिले. अनेकदा त्याने बोलणे करुन दिले. त्यांनी चार मुद्यांचे अफिडेविट करुन द्या असेही सांगितले होते. मी तसे केले असते तर उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरे अडचणीत आले असते. मी त्यांना सांगितले की, अनिल देशमुख कोणावरही खोटे आरोप करणार नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
महा विकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये अशाप्रकारे सातत्याने आरोप - प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसते. परंतु या आरोपांचा जनतेला काहीच लाभ नाही. जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिले प्रतिनिधी जर एकमेकांमध्ये लढू लागले तर जनतेने काय करायचे ? असा प्रश्न निर्माण होतो. राजकीय नेते जर हेवेदाव्यांत वेळ वाया घालवत असतील तर दोष नेमका कुणाला द्यायचा ?
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE