तंत्रज्ञानाचे अवलंबित्व
तंत्रज्ञानाचे अवलंबित्व
एखादे तंत्रज्ञान बंद पडल्यानंतर जगभरातील अनेक व्यवहार ठप्प होतात, हे जगाने अनुभवले आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये नुकताच बिघाड झाल्याची घटना घडली आणि जगभरात खळबळ उडाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या सर्व्हरमधील बिघाडानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांतील हवाई सेवांवर त्याचा परिणाम झाला आहे. केवळ एअरलाइन्सच नाही तर अनेक देशांच्या बँकिंग यंत्रणा आणि शेअर बाजारांच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये ही समस्या क्राउड स्ट्राइकमुळे आली असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी मानवाचे सर्व जीवन तंत्रज्ञानाला जोडलेले आहे, हे खरे ! तंत्रज्ञान नसेल तर ८५ टक्के मानवी जीवन व्यर्थ आहे, असे म्हणता येईल.
क्राउड स्ट्राईकमधील एररमुळे मायक्रोसॉफ्ट विंडोज कॉम्प्युटर वापरत असलेल्या जगभरातील युझर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे संपूर्ण जगातील कामकाज ठप्प झाले आहे. देशातील एअरलाइन्समध्ये इंडिगो, स्पाइसजेट आणि आकासा एअरचा समावेश असून या फ्लाईट्सच्या बुकिंग आणि चेक इन सेवांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. जग तंत्रज्ञानावर चालले आहे. याचवेळी डोंगरकपाडीत राहणारे वंचित लोक पर्यावरणावर अवलंबून आहेत. काही तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर परिणाम होतो, तेव्हा मानव जात अस्तित्वहीन होईल अशी भीती व्यक्त होत आहे.
क्राउड स्ट्राइकच्या अपडेटनंतर जगभरातील सिस्टीममधील ही अडचण सुरू झाली. या अपडेटनंतर, मायक्रोसॉफ्टचा सपोर्ट असलेली बहुतांश उपकरणे चालू असताना क्रॅश होत आहेत. वापरकर्त्यांना त्यांच्या लॅपटॉपवर अचानक निळा स्क्रीन दिसत आहे आणि लॅपटॉप रिकव्हरी मोडमध्ये जात आहे. क्राऊड स्ट्राईक ही सायबर सुरक्षा कंपनी आहे. हे जगभरातील बहुतेक संगणक आणि लॅपटॉपसाठी प्रगत सायबर सुरक्षा उपाय प्रदान करते. म्हणजे, जे सर्व प्रकारचे सायबर हल्ले रोखते. क्राउड स्ट्राइक ही कंपनी विंडोज कॉम्प्युटर्ससाठी ॲडव्हान्स्ड सायबर संरक्षण उपाय प्रदान करते आणि फाल्कन हे क्राउड स्ट्राइकचे मुख्य प्रॉडक्ट आहे. फाल्कनमधील टेक्निकल एररमुळे हे आउटेज निर्माण झाले आहे. कंपनीचे फाल्कन उत्पादन नेटवर्कवर दुर्भावनापूर्ण किंवा व्हायरसयुक्त फायली शोधते. हे दुर्भावनापूर्ण फाइल्स शोधण्यासाठी आणि व्हायरस थांबवण्यासाठी एआय तंत्रज्ञान वापरते. फाल्कन सिस्टीम ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन असो, एंडपॉइंट सुरक्षा करू शकते.
ब्लू स्क्रीन ऑफ डेथला ब्लॅक स्क्रीन एरर असेही म्हणतात. हार्डवेअर फेलियर ते सॉफ्टवेअर समस्येमुळे ब्लू स्क्रीन ऑफ डेथचा सामना केला जाऊ शकतो. ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर दिसणारी कोरी निळी स्क्रीन आहे. जेव्हा सिस्टम काही मोठ्या समस्येमुळे क्रॅश होते, जे त्यास सुरक्षितपणे कार्य करण्यापासून प्रतिबंधित करते तेव्हा असे होते. जेव्हा ही समस्या उद्भवते, तेव्हा संगणक अनपेक्षितपणे रीस्टार्ट होऊ शकतो आणि परिणामी जतन न केलेला डेटा गमावला जाऊ शकतो. जर तुमचा लॅपटॉपदेखील बीएसओडी समस्येचा बळी ठरला असेल तर घाबरण्याची गरज नाही, मायक्रोसॉफ्ट आणि क्राउड स्ट्राइक सध्या या समस्येवर काम करत आहेत. ते लवकरच याबाबत तांत्रिक इशारा जारी करू शकतात. परंतु, जोपर्यंत तांत्रिक सूचना जारी होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या लॅपटॉपशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू नये. सध्या कंपन्या या समस्येच्या निराकरणावर काम करत आहेत आणि लवकरच यासंबंधी अपडेट जारी केले जाऊ शकते.
मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो. बीपीओ, कॉल सेंटर क्षेत्रात माहिती मिळवणे व जतन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट तंत्रज्ञान वापरले जाते. विमानोड्डाणाची माहिती देण्यासाठी ते तंत्रज्ञान वापरले जाते. शेअरबाजारातील आकडेमोड व माहिती, गणिते याच तंत्रज्ञानावर आधारित आहेत. मानव पूर्णपणे या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. मानवाने तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पर्यावरणाचा नाश केला आहे. हे जरी खरे असले तरी तंत्रज्ञान हे मानवाचे नित्याच्या सवयीचा भाग बनला आहे. हे तंत्रज्ञान व त्यातील धोके कसे टाळता येतील, यावर कधी कधी चर्चा होते ती यामुळेच.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे