मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!
मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!
मुंबई, - मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळांचं कामदेखील खोळंबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. एक्स या समाजमाध्यावर पोस्ट शेअर करत अनेक यूजर्सने याबाबत तक्रार केली आहे. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
अनेकांना फटका
मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या या बिघाडाचा फटका भारतासह जगभरातील बॅंका आणि विमान सेवेलाही बसला आहे. मुंबईसह देशभरातील अन्य काही महत्त्वाच्या विमानतळांवरचे सर्व्हर ठप्प झाले आहेत. स्पाईसजेटनेही विमानसेवा ठप्प झाल्याचे म्हटलं आहे. विमानसेवेबरोबरच बॅंकांचे व्यवहारदेखील ठप्प झाले आहेत.
ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय?
प्रसिद्ध सायबर सुरक्षा कंपनीने एक अपडेट सांगितली, ज्यानंतर MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप अचानक क्रॅश होत आहेत. काम करत असताना लॅपटॉप अचानक बंद होत आहेत आणि त्यानंतर यूजर्सना निळा स्क्रीन दिसत आहे. स्क्रीनवर सांगितले जात आहे की तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेलाच ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) म्हटले जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE