दुबईच्या राजकुमारीनं इन्स्टाग्रामवरून नवऱ्याला दिला तलाक
दुबईच्या राजकुमारीनं इन्स्टाग्रामवरून नवऱ्याला दिला तलाक
अबुधाबी -: दुबईमधून घटस्फोटाचं एक चमत्कारिक प्रकरण समोर आल आहे.. दुबईच्या राजकुमारीनं त्यांच्या नवऱ्याला इन्स्टाग्राम पोस्टवरुन जाहीरपणे घटस्फोट दिला आहे. दुबईच्या राजकुमारी शेखा महरा बिंत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी त्यांचा नवरा शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतूम (Sheikh Mana Bin Mohammed Bin Rashid bin Mana Al Maktoum) यांच्यापासून वेगळं होण्याची घोषणा केली आहे.राजकुमारींनी त्यांच्या नवऱ्याला मुस्लीम परंपरेनुसार ट्रिपल तलाक दिला आहे. राजकुमारीचं मागच्या वर्षी मे महिन्यात लग्न झालं होतं. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना पहिलं मुलं झालं आहे. शेख महारा या दुबईचे राज्यकर्ते, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कन्या आहेत. त्या महिलांच्या हक्काच्या पुरस्कर्त्या आहेत. त्यांनी ब्रिटनमधील विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदवी पूर्ण केलीय.
शेखा महरा यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हंटलंय, ‘प्रिय नवरा, तुम्ही दुसऱ्यासोबत व्यस्त आहात. त्यामुळे मी तुम्हाला तलाक देत असल्याची घोषणा करत आहे. मी तुम्हाला तलाक देत आहे. तलाक देत आहे, आणि तलाक देत आहे. स्वत:ची काळजी घ्या. तुमची माजी पत्नी’
शेखा महरा यांनी नवऱ्याला घटस्फोट देण्याबरोबरच त्यांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. त्याचबरोबर लग्नातील सर्व फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन हटवली आहेत. शेख महिरा यांनी आठवडाभरापूर्वीच त्यांच्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता. ‘फक्त आम्ही दोघं’ असं लिहून त्यांनी ही पोस्ट केली होती. या जोडप्यात सर्व काही अलबेल नसल्याचे संकेत त्यांनी या पोस्टमधून दिले असल्याचं मानलं जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar