ब्रिटनमध्ये सत्ता पालट, लेबर पक्षाला दणदणीत यश, ऋषि सुनक यांचा पराभव
ब्रिटनमध्ये सत्ता पालट, लेबर पक्षाला दणदणीत यश, ऋषि सुनक यांचा पराभव
लंडन, -: ब्रिटनमध्ये काल झालेल्या संसदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय वंशाचे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ब्रिटनच्या संसदेत एकूण ६५० जागा असून कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत प्रस्थापित करण्यासाठी ३२६ जागा जिंकण्याची आवश्यकता असते. लेबर पक्षाने अभुतपूर्व यश मिळवले असून ४०० पार जागा ताब्यात घेतल्या आहेत. युके सीनबीके या वृत्तस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मजूर पक्षाने ४१२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने १२० जागा जिंकल्या आहेत. ब्रिटनमध्ये तब्बल १४ वर्ष सत्तेत असलेला कन्झर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेबाहेर फेकला जाईल असा अंदाज एक्झिट पोलद्वारे व्यक्त करण्यात आला होता. लेबर पार्टीचे नेते, विरोधी पक्षनेते कीर स्टार्मर Keir Starmer हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहे. या निवडणुकीत स्टार्मर यांनी लेबर पार्टीच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते.
सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा गेल्या दोन वर्षांचा कारभार आणि उलथापालथ पाहता यादरम्यान अनेक वाद निर्माण झाले होते. त्यात पंतप्रधानांची तडकाफडकी बदलणे, ब्रिटनची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि कोव्हिड-१९ साथीचे ढिसाळ व्यवस्थापन हे निवडणुकीतील प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे ठरले होते. मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव होण्यासाठी हे मुद्दे कारणीभूत निष्कर्ष काढले जात आहेत. लेबर पार्टी, कन्झर्व्हेटिव्ह पार्टी, लिबरल डेमोक्रॅट्स, रिफॉर्म यूके, स्कॉटिश नॅशनल पार्टी (एसएनपी) आणि ग्रीन पार्टी हे प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते.
कीर स्टार्मर यांच्या लेबर सरकारच्या काळात पक्षाच्या नेत्या अँजेला रायनर यांना उपपंतप्रधानपद दिले जाण्याची शक्यता आहे, तर अर्थतज्ज्ञ रेचल रीव्ह्स यांना अर्थमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने यंदा सर्वात वाईट निवडणूक मोहीम राबवली होती असं ३८ टक्के ब्रिटनच्या नागरिकांना वाटते तर लेबर पार्टीची प्रचार मोहीम वाईट होती असं केवळ ८ टक्के लोकांना वाटतं.
कन्झर्व्हेटिव्ह पार्टीने प्रचारादरम्यान ऋषी सुनक यांनी आपल्या २० महिन्यांच्या कारकिर्दीत ब्रिटनमध्ये आर्थिक सुधारणांवर लक्ष केंद्रित केले होते. जर सरकार बदललं तर अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असा प्रचार केला होता. तर कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीने माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी संबंधित वाद, कोविड -१९ महामारीतील गैरव्यवस्थापन आणि त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान कामगारांच्या हक्कांच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Malaika Arora
- जन्मदिन
- October 23
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे